पाटणा : बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता आल्यास आम्ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणामागील खºया कारस्थानाचा पर्दाफाश करु, असा दावा भाजप आमदार नीरजकुमार उर्फ बबलु सिंह यांनी केला आहे. नीरजकुमार हे सुशांत सिंह याचे चुलतभाऊ आहेत. बिहारमध्ये सध्या चांगले वातावरण आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत येईल. याठिकाणी डबल इंजिनचे सरकार चालते. लोक खुष आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एनडीएचा पराभव होणार नाही, असा दावा यावेळी नीरजकुमार यांनी केला. नितीश १५वर्षे मुख्यमंत्री आहेत. आणखी पाच वर्षे राहतील. त्यानंतर त्याचे वय ७५ वर्षे होईल. मग कुणाला राजकारणात रस असतो. त्यानंतर ते शांतपणे देशसेवा-समाजसेवा करतील. त्यामुळे नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले.
या निवडणुकीत ठऊअ पूर्ण बहुमताने सत्तेत येईल. आम्हाला जवळपास ७० टक्के मते मिळतील, असे नीरजकुमार यांनी सांगितले. याठिकाणी परिवर्तन करण्याची गरज नाही. लोकांना पुन्हा जंगलराज नको आहे. त्या राजवटीला लोक वैतागले होते. मतदार सतर्क आहेत. जी गर्दी त्यांच्याकडे जमा झाली ती आणली गेली होती, ती केवळ हेलिकॉप्टर बघण्यासाठी व्हायची, अशा शब्दांत नीरजकुमार यांनी तेजस्वी यादव यांची खिल्ली उडविली.
सेल्फीचा नादात दरीत पडून महिलेचा मृत्य