24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयतर, दोन हात होऊन जाऊ द्या!

तर, दोन हात होऊन जाऊ द्या!

- गृहमंत्री अमित शाह यांचे ममता बॅनर्जी यांना आव्हान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजना लागू करण्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला असून, राजकारण करायचे असेल तर तुम्हीच मैदान ठरवा, त्या ठिकाणी दोन हात होऊन जाऊ दे, अशा शब्दांत अमित शाह यांनी त्यांना आव्हान दिले आहे.

केंद्र सरकारची चांगली आयुष्यमान भारत योजना आजही पश्चिम बंगालमध्ये लागू नाही. अन्य सर्व राज्यांनी ही योजना लागू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील दिल्लीमध्ये ही योजना लागू केली. परंतु ममता बॅनर्जी ही योजना पश्चिम बंगालमध्ये लागू करत नाहीत. त्या ही योजना का लागू करत नाहीत हे आम्हाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेला ऐकायचे आहे. अशा बाबींमध्ये राजकारण करू नये. परंतु याव्यतिरिक्त राजकारण करायचे असेल तर तुम्हीच मैदान ठरवा, त्या ठिकाणी दोन हात होऊन जाऊ दे, अशा शब्दांत अमित शाह यांनी त्यांना आव्हान दिले.

Read More  अनैतिक संबंधातून पतीची हत्या : पत्नी, प्रियकरानेही स्वतःला संपवलं

सहा वर्षांमध्ये रचना नव्या भारताचा पाया
अमित शाह यांनी आज पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केले. त्यांची ही सभा आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. २०१९ पर्यंत त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर दुसºया कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण झाले. त्यांनी देशाला सन्मान मिळवून दिला. सहा वर्षांमध्ये नव्या भारताची पाया रचला. परंतु ममता बॅनर्जी तुम्ही गेल्या १० वर्षांचा हिशोब द्या. परंतु बॉम्बस्फोट आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मृत्यूचा आकडा सांगू नका. यावेळी पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन नक्की होणार, असा विश्वासही शाह यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या