34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयतर बेरोजगारी ४० टक्क्यांनी कमी करु

तर बेरोजगारी ४० टक्क्यांनी कमी करु

एकमत ऑनलाईन

पुदुच्चेरी : केंद्रीय गृह मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा आज पुदुच्चेरीच्या दौºयावर आहेत. त्यांनी आज कराईकलमध्ये एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना बेरोजगारी निर्मूलनाचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे अलिकडेच ट्विटरवर अनेक तरुणांनी बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रोश व्यक्त केल्याने मोदी रोजगार दो नावाचा एक हॅश्टॅग ट्रेंड झाला होता. त्यापार्श्वभूमीवर शहा यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

यावेळी त्यांनी म्हटले की, जर तरुणांनी एनडीएला मतदान केले तर त्यांचे सरकार केंद्र शासित प्रदेशातील बेरोजगारीचा दर ४० टक्क्यांनी कमी करेल. यावेळी शहा यांनी असाही आरोप केला आहे की, पुदुच्चेरीमध्ये आधीच्या काँग्रेस सरकारने केंद्र सरकारच्या योजनांच्या बाबतीत अत्यंत तुच्छ राजकारण केले आहे.शहा यांनी म्हटले की, पुदुच्चेरीमध्ये पुढील सरकार हे एनडीएचे होणार आहे. फक्त पुदुच्चेरीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये सामील होत आहेत. कारण काँग्रेस पक्षामध्ये पात्रतेला काहीही किंमत दिली जात नाही.

शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी विचारले होते की, मत्स्य विभाग देशात का नाही आहे? मी लोंकाकडून जाणून घेऊ इच्छितो की त्यांना असा नेता हवाय का ज्याला हे देखील माहिती नाहीये की, मत्स्य विभाग गेल्या २ वर्षांपासून देशात अस्तित्वात आहे. पुढे त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, हे काँग्रेसचे नेते सुट्टीवर होते तेंव्हाच केंद्रातील एनडीए सरकारने २०१९ मध्ये या मंत्रालयाची स्थापना केली होती.

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; ३६ पैकी २८ जिल्ह्यांत संसर्ग पुन्हा वाढला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या