पाटणा : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप जदयू युतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात उतरले आहेत. मोदींच्या रॅपिड सभा आयोजित करण्यात आले आहेत. या सभांवरून लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे.
नितीश कुमार यांना पाहून बिहार मधील एकही नागरिक मत देणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील माहित आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॅपीड सभा घ्याव्या लागत आहेत. बिहार निवडणुकीत खूप मेहनत घेत आहेत असे वक्तव्य चिराग पासवान यांनी केले आहे. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला.
मला कळत नाहीये की भाजप नेते एखाद्या भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांसमोर एवढे का दुखत आहेत. अशा वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्ते यांच्या मनोबलावर परिणाम होत आहे़ नितीश कुमार यांना स्वत:ला माहित आहे की ते जास्त जागा जिंकू शकत नाही, असे देखील चिराग पास्वान यांनी यावेळी सांगितले.
फ्रान्समध्ये चर्चच्या परिसरात गोळीबार ;फादर जखमी