19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयसोशल डिस्टन्सिंग; जनता आणि भाजप दुरावणार नाही!

सोशल डिस्टन्सिंग; जनता आणि भाजप दुरावणार नाही!

- गृहमंत्री अमित शाह यांचा विश्वास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: कोविड १९ हे जागतिक संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल डिस्टन्सिंगचा नारा दिला आहे. मात्र जनता आणि भाजप यांच्यात सोशल डिस्टन्सिंग अंतर पाडू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

ओडिशा जन संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. सोमवारी अमित शाह यांनी ओडिशातील लोकांशी व्हर्चुअल संवाद साधला त्यात ते बोलत होते. भाजपाने फक्त राजकारणच केले नाही. आम्ही जनतेच्या समस्या जाणून घेतो आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न कायमच करतो, असेही शाह यांनी म्हटले आहे. सध्याचा काळ हा कोरोना संकटाचा काळ आहे. कोरोना हे संपूर्ण जगावर आलेले संकट आहे. अशा संकटाच्या काळातही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जनतेशी संवाद साधण्याची ही परंपरा सुरु ठेवली आहे.

आपल्या पक्षाची मूळं बळकट करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.कोरोना काळात कार्यकर्त्यांनी कोट्यवधी लोकांना मदत केली कोरोना संकटाच्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ११ कोटी पेक्षा जास्त लोकांना अन्न पुरवण्याचे काम केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आपण याबद्दल अभिनंदन करतो असेही शाह यांनी स्पष्ट केले. ओडिशा प्रमाणेच इतर राज्यांमध्ये सुमारे ४२ टक्के घरांमध्ये नळाला पाणी येत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन सुरु केले आहे. या अंतर्गत २०२२ पर्यंत २५ कोटी लोकांच्या घरात पाइपलाइनद्वारे स्वच्छ पाणी येईल, अशी व्यवस्था केली जात आहे अशीही माहिती शाह यांनी दिली.

Read More  हिंगोलीत आणखी ८ जणांना कोरोनाची लागण

याशिवाय त्यांनी दहशतवादी कारवायांवरही भाष्य केले. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये उरी, पुलवामा या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. मात्र पाकिस्तानला आम्ही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन धडा शिकवला असंही शाह यांनी म्हटले आहे़

सीमेवरचे सत्य सर्वश्रृत: राहुल गांधी

सीमेवरचे सत्य सर्वश्रृत असून, आता भारत आणि चीनची माहिती देशवासीयांना असल्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शायरीच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करताना एक विधान केले होते. त्यावरुन राहुल गांधींनी अमित शाह यांना लक्ष्य केले आहे.

भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे, असे विधान अमित शाह यांनी बिहारमधील डिजीटल सभेला संबोधित करताना केले होते. अमित शाह यांचे हे विधान ट्विटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या