30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयगलवान खो-यातील सैनिकांना विशेष पोशाखाची गरज

गलवान खो-यातील सैनिकांना विशेष पोशाखाची गरज

एकमत ऑनलाईन

लडाख: गलवान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांना आता पाण्यापासून बचाव करणा-या विशेष पोशाखाची गरज निर्माण झाली आहे. गलवानमध्ये जे लष्कर चीनविरोधात तैनात आहे़ त्यांना आता हे पोशाख मिळणे अत्यावश््यक वाटू लागले आहे. गलवान नदीचे पाणी अत्यंत थंड आहे. अशात चिनी सैनिकांनी वॉटरप्रुफ पोशाखाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ते तिथे उभे राहू शकतात. आता भारतीय सैनिकांनाही विशिष्ट पोशाखांची गरज निर्माण झाली आहे.

सध्याच्या घडीला बर्फासारख्या थंड पाण्यापासून आमचा बचाव होऊ शकेल अशा विशेष पोशाखांची आम्हाला गरज आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होते आह़े़ त्यामुळे चीन विरोधात उभे राहायचे असेल तर, आम्हाला विशेष पोशाखांची नितांत गरज आहे, असे भारतीय लष्कराने म्हटल्याची माहिती काही खास सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

चीनी सैनिकांकडे वॉटरप्रुफ पोशाख

चीनच्या सैनिकांनी त्यांचे तळ गलवान नदीच्या आणि खो-याच्या ज्या भागांमध्ये तयार केले आहेत़ त्यांच्याकडे थंड पाण्यापासून बचाव करण्यासाठी विशेष पोशाख आहेत. अशा पोशाखामुळे ते थंडगार पाण्यातही उभे राहू शकत आहेत. इंडियन पेट्रोलिंग पॉर्इंट १४ जवळ जेव्हा त्यांचे काही सैनिक आले होते़ तेव्हा ही बाब समजली असेही सैन्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Read More  कोरोनाच्या भीतीने शिक्षकाने गळफास घेवून केली आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या