22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयजावई आणि सासू पडले एकमेकांच्या प्रेमात

जावई आणि सासू पडले एकमेकांच्या प्रेमात

एकमत ऑनलाईन

बाडमेर : जावई आपल्या सासूच्या प्रेमात पडला. सासूही जावयावर प्रेम करूलागली. यानंतर दोघांनीही झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. होताराम भील (२५, रा. केरवा) आणि डारिया (रा. खार्तिया) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यात सोमवारी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत होतारामचा विवाह एक वर्षापूर्वी खरटीया येथील नेमाराम यांची मुलगी गीता (२०) हिच्याशी झाला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी होताराम पत्नी गीतासोबत सासरच्या घरी आला होता. दरम्यान, होताराम व त्याची सासू डारिया सोमवारी कोणालाही न सांगता घरातून पळून गेले. गावापासून ३० किमी अंतरावर असलेल्या बारमेर मुनाबाव रस्त्यावरील खेजरीच्या झाडाला त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह उतरवले. मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासात प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणाची बाब समोर येत असली तरी या प्रकरणाची सविस्तर माहिती तपासानंतरच समोर येईल, असे ग्रामीण पोलिस अधिकारी पर्वत सिंह यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या