नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करीत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना विषाणू संबधित आजार बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करत सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्ली येथील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना संबधित त्रास बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात येणार आहे. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आता अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी दिल्यामुळे कार्यकर्ते काहीसे चिंतीत झाले आहेत.