नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी २६ वर्षीय विधवा महिलेच्या तक्रारीवरून सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरुद्ध बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. तसेच लग्नाचेही आश्वासन दिले होते, असे महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेवर आरोपीने बलात्कार केला आणि या प्रकरणाची तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
२५ जून रोजी उत्तमनगर पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही तपास करीत आहे, असे द्वारकाचे पोलिस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले.
पोलिस एका ७१ वर्षीय व्यक्तीवर लावलेल्या आरोपांची चौकशी करीत आहे. जो एका वरिष्ठ राजकीय नेत्याचा खासगी सचिव म्हणून काम करीत होता. डीसीपीने राजकीय नेत्याचे नाव घेतले नसले तरी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की माधवनवर आरोप लावले गेले. महिला दिल्लीत राहते आणि तिच्या पतीचा २०२० मध्ये मृत्यू झाला. पती काँग्रेस पक्ष कार्यालयात काम करायचा. ते होर्डिंग्ज लावायचा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.