24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeराष्ट्रीय3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी - सोनू सूद

3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी – सोनू सूद

एकमत ऑनलाईन

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या जन्मभूमीत पाठवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करण्यापर्यंत सर्व समाजकार्य सोनू सूदनं केली आहेत. आज सोनू सूद त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण वाढदिवसाला सोनू सूदनं स्थलांतरित मजुरांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सोनूने स्थलांतरित मजुरांसाठी ‘प्रवासी रोजगार.कॉम’ ही वेबसाईट सुरू केली आहे आणि त्यातून तो 3 लाख मजुरांना नोकरी देणार आहे. माझ्या वाढदिवसाला स्थलांतरित बांधवांसाठी 3 लाख नोकरी देण्यासाठी http://pravasirojgar.com चा माझा संकल्प… या नोकरींत तुम्हाला PF, ESI आणि अन्य सुविधाही मिळणार आहेत, असं ट्विट सोनू सूदने केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. सोनू सूद बेरोजगार तरुणांना नोकरी देणार आहे. त्याची ही वेबसाईट कोणतही शुल्क आकारत नाही. या वेबसाईटवर 450 कंपन्या नोकरी देणार आहेत आणि आतापर्यंत 1 लाख लोकांना नोकरी दिली गेली आहे. अधिक माहितीसाठी 1800 121 664422 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Read More  विलासराव देशमुख विद्यालयाची यशाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या