17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeराष्ट्रीयनितिश मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

नितिश मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

एकमत ऑनलाईन

पाटणा : काही दिवसांपुर्वी शपथ घेतलेल्या बिहारमधील नितिशकुमार मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते. सध्या प्रत्येक मंत्र्याकडे पाच खात्यांची जबाबदारी दिली आहे. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे ६ खाती आहेत.

विजय कुमार चौधरी आणि अशोक चौधरी यांच्याकडे प्रत्येकी ५ खाती आहेत. तर विजेंदर प्रसाद यादव यांच्याकडे ४ खाती आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री रेणू देवी, मंगल पांडे, अमरेंद्र प्रताप आणि जीवेश कुमार यांच्याकडे प्रत्येकी ३ खाती आहेत. राम सुंदर राय आणि संतोषकुमार सुमन यांच्याकडे प्रत्येकी २ आणि शीला कुमारी, मुकेश सहनी आणि रामप्रीत पासवान यांच्याकडे प्रत्येकी एक खाते आहे.

तेजस विमानाची घातकता वाढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या