34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयलवकरच मदरशांमध्ये घुमणार रामायण,भगवद्गीतेचे सूर

लवकरच मदरशांमध्ये घुमणार रामायण,भगवद्गीतेचे सूर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्राचीन भारतीय ज्ञान आणि परंपरा भारतातील सर्वच समाजांच्या विद्यार्थ्यांना समजावी, यासाठी आता मदरशांमध्येही रामायण आणि भगवद्गीतेचे धडे दिले जाणार आहेत. तसेच शरीर व मन निरोगी रहावे, यासाठी योगाचेही धडे दिले जातील. नॅशनल इंस्­टिट्यूट ऑफ ओपन स्­कुलिंगने याबाबत अभ्यासक्रमाची तयारी सुरु केली असून पहिल्या टप्प्यात १०० मदरशांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यानंतर सर्वच देशभरात तो लागू होणार आहे.

नॅशनल इन्सिट्यूट ऑफ ओपन स्­कूलिंगचा हा नवा अभ्यासक्रम नव्या शिक्षण धोरणाचा भाग आहे. शिक्षण मंत्रालयांतर्गत येणा-या एनआयओएस वर्ग ३, ५ आणि ८ साठी बेसिक कोर्सची सुरुवात करेल. सुरुवातीला १०० मदरशांपासून याची सुरुवात करण्यात येईल. तसेच भविष्यात हा कार्यक्रम ५०० मदरशांपर्यंत नेण्यात येईल, अशी माहिती एनआयओएसचे अध्यक्ष सरोज शर्मा यांनी दिली आहे.

नॅशनल इन्सिट्यूट ऑफ ओपन स्­कुलिंगने भारतीय ज्ञान परंपरेसंदर्भात १५ कोर्स तयार केले आहेत. यात वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, व्यावसायिक कौशल, रामायण, गीता आणि पाणिनी-प्रवर्तित महेश्वरा सूत्र यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम तिस-या, पाचव्या आणि ८ वीच्या वर्गाच्या बरोबरचा आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी नोएडा येथील एनआयओएसच्या केंद्रीय मुख्­यालयात याचे स्­टडी मटेरिअल जारी केले. भारत हा प्राचीन भाषा, विज्ञान, कला, संस्­कृती आणि परंपरांची खाण आहे. आता देश आपली प्राचीन परंपरा पुनर्जीवित करून ज्ञानाच्या क्षेत्रात सुपरपॉवर होण्यास तयार आहे. आपण या कोर्सचा लाभ मदरसा आणि जगभरातील समाजापर्यंत पोहोचवू, असे त्यांनी म्हटले आहे.

अनुराग, तापसी पन्नूच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या