37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयभारत बायोटेकच्या नेझल स्प्रेची लवकरच चाचणी

भारत बायोटेकच्या नेझल स्प्रेची लवकरच चाचणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगात सर्वाधिक वेगाने लसीकरए भारतात केले जात आहे. अशातच आता हा वेग आणखी गतिमान होण्याची चिन्हे आहेत. कोवॅक्सीन बनवणाºया हैदराबादमधील भारत बायटेकची निर्मिती असणाºया आणि नाकाद्वारे दिल्या जाणाºया लसीची चाचणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. या लसीचं नाव बीबीव्ही१५४ असे आहे. ही इंटरनेझल म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी लस आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल आॅर्गनायजेशनने (सीडीएससीओ) भारत बायोटेकला या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती.

लसीच्या चाचणीची सर्व प्राथमिक प्रकिया पूर्ण झाली असून पुढील आठवड्यामध्ये चाचणी होणार आहे. पाटणा, चेन्नई, नागपूर आणि हैदराबाद या मोठ्या शहरांची त्यासाठी निवड केली आहे. या चार शहरांमधील १७५ रुग्णांना हा नेझल स्प्रे दिला जाणार आहे. सेंट्रल ट्रायल रजिस्ट्री आॅफ इंडियाने (सीटीआरआय) रुग्णांची निवड केल्यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सध्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मात्र या दोन्ही लसी इंट्रामस्कुलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या आहेत. त्यापेक्षा ही नाकावाटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा केला जात आहे. नाकावाटे लसीमुळे लसीकरणाचा वेग वाढून ते अधिक स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

१ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या