24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयअत्याधुनिक अर्जुन रणगाडे लवकरच मिळणार

अत्याधुनिक अर्जुन रणगाडे लवकरच मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताच्या लष्कराला स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती मिळणार आहे. संरक्षण दलाने ११८ ‘अर्जुन एमके-१ ए’ रणगाड्याची ऑर्डर चेन्नई स्थित आयुध निर्माण कारखान्याच्या ‘हेवी व्हेहिकल फॅक्टरी’ला दिली आहे. यामुळे पुढील काही महिन्यांत संरक्षण दलात अत्याधुनिक अर्जुन एमके-१ ए रणगाडे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ११८ रणगाड्यांची किंमत ही ७ हजार ५२३ कोटी रुपये एवढी आहे.

डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ब-याच वर्षांच्या संशोधनानंतर स्वदेशी बनावटीचा अर्जुन रणगाडा (अर्जुन एमके-१) विकसित केला होता. मात्र, संरक्षण दलाने यात अनेक बदल सुचवले. २०१२ पर्यंत एकूण १२४ अर्जुन रणगाडे हे लष्करात दाखल झाले. असे असले तरी बदलत्या काळानुसार आणि संरक्षण दलाची नवी गरज लक्षात घेता अर्जुन रणगाड्यामध्ये आणखी बदल संरक्षण दलाने सुचवले. तेव्हा अर्जुन एमके-१ रणगाड्यात आणखी ७२ बदल करत अर्जुन रणगाड्याची नवी आवृत्ती ‘अर्जुन एमके-१ ए’ ही डीआरडीओने विकसित केली. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान यांच्या हस्ते पहिला अर्जुन एमके-१ ए रणगाडा लष्कराकडे दिला होता.

लष्कराने विविध ठिकाणी सखोल चाचण्यानंतर अर्जुन एमके-१ ए रणगाड्याला स्वीकारले आणि ११८ रणगाड्यांची ऑर्डर दिली.
११८ रणगाड्यांच्या निर्मितीमुळे उद्योग क्षेत्रात ८००० जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास डीआरडीओने व्यक्त केला. अर्जुन एमके-१ ए रणगाड्याचा समावेश जरी होणार असला तरी ही संख्या लष्कराकडे असलेल्या एकूण रणगाड्यांच्या संख्येच्या तुलनेत नगण्य अशी आहे. लष्कराने अजूनही पूर्णपणे अर्जुनसारख्या स्वदेशी बनावटीच्या रणगाड्यावर विश्वास दाखवलेला नाही. लष्कराची भिस्त आजही रशियाचे तंत्रज्ञान असलेल्या टी-९० सारख्या रणगाड्यावर आहे. तेव्हा येत्या काळांत स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान असलेले आणखी अत्याधुनिक रणगाडे डीआरडीओ कधीपर्यंत विकसित करतात हे बघणे उत्सुकतेचे असेल.

अर्जुन एमके-१ एची वैशिष्ट्ये
अर्जुन एमके-१ ए रणगाड्याचे वजन तब्बल ६८ टन एवढे आहे. जगातील सर्वात वजनदार रणगाडा म्हणून अर्जुन एमके-१ ए रणगाडा ओळखला जात आहे. असे असले तरी भारतातील सर्व प्रकारच्या प्रदेशात जास्तीत जास्त ५८ किलोमीटर प्रतितास या वेगाने संचार करण्याची क्षमता या रणगाड्याने सिद्ध केली. १२० मिलीमीटर तोफेतून वेगाने तोफगोळे डागण्याची या रणगाड्याची क्षमता उच्च प्रतीची आहे. दिवस असो वा रात्र किंवा कोणताही ऋतू, कोणत्यााही परिस्थितीत रणभूमीवर टिकाव धरु शकेल, अशी या रणगाड्याची अचाट अशी क्षमता असल्याचा दावा डीआरडीओने केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या