पाटणा : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेक सुरू आहे. मात्र राजकारणानंतर सुुखदु:खाचे प्रसंग असतील तेव्हा एकमेकांची काळजी घेण्याची संस्कृतीही जोपासण्यात येत आहे. मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री नितीश कुमार, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव एकत्र आले होते.त्यात याची प्रचिती आली.
राजकीय रणधुमाळीत राजदचे नेते तेजस्वी यादव हे नितिशकुमार यांच्यावर जोरदार टीका करीत आहेत. नितिशकुमार यांच्याकडूनही तेजस्वी राजकारणात नवखे असल्यााची टीका केली जाते. मात्र बुधवारी हे दोघेही दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात समोरासमोर आले. कार्यक्रमाप्रसंगी तेजस्वी यादव यांनी शेजारी बसलेल्या नितीश कुमारांना निवडणुकीच्या प्रचारामुळे आपला घसा बसल्याचे सांगितले. यावेळी नितीश कुमार यांनी त्यांना कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला त्यामुळे प्रचारावेळी घसा नीट राहील असेही सांगितले. आपण प्रचाराच्या भाषणानंतरही कोमट पाणी पितो, असेही नितीश कुमार यांनी सांगितले.
जॉर्ज फर्नाडिस यांनी नितीशकुमारांना दिला हाच सल्ला
नितीश कुमारही पूर्वी थंड पाण्यामुळे घसा खराब झाल्याचे पत्रकारांना सांगत असत. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला होता. फर्नांडिस यांच्या सल्ल्यानुसार नितीश कुमार यांनी कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर निवडणूक प्रचाराच्या काळात घशासंदर्भात कधीही तक्रार केली नाही.
सरकारने नुकसानीच्या मदतीसाठी कृतीवर भर द्यावा