26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसोरेन राजीनामा देणार

सोरेन राजीनामा देणार

एकमत ऑनलाईन

रांची : देशातील भाजप विरोधी सरकारे पडण्याची मालिका सुरूच असून आता त्यामध्ये झारखंडचाही समावेश होण्याची शक्यता आहे. खाण घोटाळ््यामध्ये आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची धोक्यात आल्यानंतर ते आता राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. ते आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजीनाम्यानंतर ते पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

खाण घोटाळ््यात नाव आल्यानंतर हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करावी, अशी शिफारस निवडणूक आयोगाने राज्यपालांकडे केली होती. या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू असल्याने त्यांची आमदारकी रद्द करावी, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. आता त्यावर झारखंडचे राज्यपाल निर्णय घेणार आहेत. त्या आधीच मुख्यमंत्री हेमंत सोरेन आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या