23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयसंस्कृतमध्ये एक लाइन बोलून दाखवा; राष्ट्रभाषा करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

संस्कृतमध्ये एक लाइन बोलून दाखवा; राष्ट्रभाषा करण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संस्कृतला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. ‘हा धोरणात्मक निर्णय आहे. यासाठी घटनेत दुरुस्ती आवश्यक आहे’, असे न्यायालयाने सांगितले. जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याला संस्कृतमधील एक ओळ वाचण्यास सांगितले.

निवृत्त डीजी वंजारा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. संस्कृतला राष्ट्रभाषा घोषित करून भाषेच्या संवर्धनाबाबत ते बोलले. यावर न्यायमूर्ती एमआर शहा आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘हे धोरण निर्णयाच्या कक्षेत येते. यासाठी राज्यघटनेतही दुरुस्ती करावी लागेल. एखाद्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यासाठी संसदेला कोणतेही रिट जारी करता येत नाही.’

खंडपीठाने विचारले, भारतातील किती शहरांमध्ये संस्कृत बोलली जाते? यावर वंजारा म्हणाले, त्यांना केंद्राकडून यावर चर्चा हवी आहे. न्यायालयाचा हस्तक्षेप सरकारी पातळीवर चर्चा सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरेल. खंडपीठाने विचारले, तुम्ही संस्कृत बोलता का? तुम्ही संस्कृतमध्ये एक ओळ बोलू शकता का?किंवा तुमच्या रिट याचिकेचे संस्कृतमध्ये भाषांतर करू शकता? यावर वंजारा यांनी एक श्लोक म्हणून दाखवला. ‘हे सर्वांना माहिती आहे’ असे खंडपीठ म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या