22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयस्पाईस जेट विमानात पुन्हा बिघाड

स्पाईस जेट विमानात पुन्हा बिघाड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : स्पाइसजेटच्या विमानातील गैरप्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीय. आज (गुरुवार) दिल्लीहून एक विमान नाशिकला जात असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं ते विमान तातडीनं दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं.

स्पाइसजेटनं दिलेल्या माहितीनुसार, विमान आणि त्यातील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना पाठवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, स्पाइसजेटचं बी ७३७ विमान गुरुवारी सकाळी दिल्लीहून नाशिकला जात होतं. विमान हवेत असताना त्याच्या ऑटो पायलटला समस्या आली. यानंतर वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली.

त्यानंतर वैमानिकाला दिल्ली विमानतळावर परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या स्पाइसजेटचं बोईंग ७३७ विमान सुरक्षितपणे उतरलं आहे. तसेच डीजीसीएनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या