24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयस्पुटनिक व्ही बाजारात दाखल

स्पुटनिक व्ही बाजारात दाखल

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : स्पुटनिक व्ही लस भारतात दाखल झाली आहे. केंद्र सरकारने स्पुटनिक व्ही लसीचा दर जाहीर केला आहे. स्पुटनिक व्ही लस भारतीय बाजारात दाखल झाली असून, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या १७० कर्मचा-यांना स्पुटनिक व्ही लस देण्यात आली आहे. स्पुटनिक व्ही लस भारतीय बाजारपेठेत ११४५ रुपयांना मिळणार आहे.

तर दुसरीकडे कोव्हिशील्ड लस खासगी रुग्णालयामध्ये ७८० रुपयांना मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लस भारतातील खासगी रुग्णालयात १४४५ रुपयांना उपलब्ध होणार आहे. भारत सरकारने कोरोना लसीकरणासाठी आपत्कालीन वापरासाठी आतापर्यंत तीन लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरमच्या कोव्हिशील्ड, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला परवानगी देण्यात आली आहे

दक्षिणेत प्रादेशिकवादाला जोर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या