18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक; प्रत्येक माहितीसाठी घ्यायचा १ हजार डॉलर्स

चीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक; प्रत्येक माहितीसाठी घ्यायचा १ हजार डॉलर्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत व चीन दरम्यान सध्या तणाव परिस्थिती निर्माण झालेली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी एका मुक्त पत्रकारास चीनसाठी हेरगिरी करण्यावरून अटक केली आहे. या पत्रकाराबरोबरच एक महिला व अन्य एक पुरूषासदेखील पोलिसांनी अटक केली आहे. प्रत्येक माहितीसाठी तो १ हजार डॉलर्स घेत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

दिल्लीमधील पीतमपुरा भागातील रहिवासी असलेला राजीव शर्मा मुक्त पत्रकार (फ्रिलान्स जर्नलिस्ट) आहे. राजीव शर्माच्या घरातून पोलिसांनी देशाच्या सुरक्षेशी निगडीत अनेक गोपनीय कागदपत्रे हस्तगत केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजीव शर्माला अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत (ऑफिशियल सीक्रेसी अ‍ॅक्ट) अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

राजीव शर्मा २०१६ ते २०१८ पर्यंत चिनी गुप्तचर अधिका-यांना संवेदनशील माहिती देत होता. अनेक देशांमध्ये शर्माने चिनी अधिका-यांची भेट घेतली होती. राजीव शर्मा चिनी गुप्तचर यंत्रणेला सीमेवरील भारतीय लष्कराची तैनाती आणि भारताच्या सीमा रणनीतीबद्दलही चिनी गुप्तचर यंत्रणेला माहिती देत होता, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी सांगितले. चिन्यांना गोपनीय माहिती देण्यासाठी अटक करण्यात आलेल्या राजीव शर्माला गेल्या एका वर्षात ४०-४५ लाख रुपये मिळाले. शर्माने प्रत्येक माहितीसाठी १००० डॉलर्स घेतले. राजीव शर्माला पत्रकारितेचा जवळजवळ ४० वर्षांचा अनुभव आहे. तो चिनी सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ मध्ये तसेच भारतातील ब-याच माध्यम संस्थांसह संरक्षण विषयावर लिहित होता. राजीव २०१६ मध्ये चिनी एजंटच्या संपर्कात आला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

पंढरपुरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा; भीमानदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या