24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयभारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची चीनकडून हेरगिरी

भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची चीनकडून हेरगिरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे १० हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर चीनस्थित एक मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.

चीनच्या आतापर्यंतच्या कायापालटात आणि ‘हायब्रीड वॉरफेर’मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘आद्य संस्था’ असे म्हणवून घेणा-या या कंपनीचे नाव ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ असे आहे. चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात आहे. ही कंपनी केवळ महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नजर ठेवून नाही, तर अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांचीही ती हेरगिरी करीत आहे.

राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यम या यंत्रणांचीही ही कंपनी हेरगिरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
राजकीय व्यक्तींव्यतिरिक्त संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह १५ माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ‘झेनुआ’ कंपनी ठेवत असल्याची माहिती हाती आली आहे. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह ‘भारत पे’ या ‘ऍप’चे संस्थापक निपुण मेहरा आणि ‘अर्थब्रिज’चे अजय त्रेहान आदी नवउद्यमींवरही ही चिनी कंपनी हेरगिरी करीत असल्याचे आढळले आहे.

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ
‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठ्यातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’चा वापर करण्यात आला. या माहितीसाठ्यााला कंपनीने ‘ओव्हरसीज की इन्फॉर्मेशन डाटाबेस’ (ओकेआयडीबी)
असे शीर्षक दिले आहे. या माहितीसाठ्यात शेकडो नोंदी आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या