23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयकाश्मीरमधील स्क्वॉड्रन, सप्टेंबर अखेरपर्यंत रिटायरमेंटची शक्यता

काश्मीरमधील स्क्वॉड्रन, सप्टेंबर अखेरपर्यंत रिटायरमेंटची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सरकारने मिग-२१ फायटर जेटची जम्मू काश्मीर स्थित स्क्वॉड्रन रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वॉर्ड आर्म नामक ही स्क्वॉड्रन सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत रिटायर होण्याची शक्यता आहे.फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकच्या बालाकोटवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुस-या दिवशी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी याच विमानाच्या मदतीने पाकचे हायटेक एफ-१६ विमान पाडले होते.

कालबा झालेल्या मिग फायटर्सच्या ४ स्क्वॉड्रनमध्ये स्वॉर्ड आर्मचाही समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उर्वरित ३ स्क्वॉड्रनही क्रमानुसार हवाई दलातून बाहेर काढले जातील. ही प्रक्रिया २०२५ पर्यंत पूर्ण होईल.फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २ आठवड्यांनी २६ फेब्रुवारी रोजी हवाई दलाच्या फायटर जेटस्नी बालाकोट स्थित जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकने २७ फेब्रुवारी रोजी भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण अभिनंदन वर्धमान व त्यांच्या सहका-यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.

त्यांनी पाकचे हायटेक एफ-१६ विमान पाडले. या लढाईत अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन पाकच्या हद्दीत क्रॅश झाले. त्यानंतर पाकने त्यांना बंधक बनवले. पण भारताच्या दबावानंतर पाकला त्यांची सुटका करावी लागली. २०१९ च्या स्वातंत्र्यदिनी त्यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आला.

१९६३ मध्ये मिग-२१ भारतीय हवाई दलात
मिगोयन-गुरेव्हिच-२१ (मिग-२१) तत्कालीन सोव्हियत संघाने तयार केले होते. त्याने १६ जून १९५५ रोजी पहिले उड्डाण घेतले. १९६२ च्या युद्धात चीनकडून पराभव झाल्यानंतर भारताने मिग-२१ ची खरेदी केली होती. संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील ६० वर्षांत ४०० हून अधिक मिग-२१ विमान क्रॅश झाले आहेत. त्यात १७० हून अधिक वैमानिक मारले गेले. यामुळे या विमानांना उडती शवपेटी किंवा विडो मेकरही म्हटले जाते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या