कलबुर्गी : कर्नाटकातील श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी लव्ह जिहादच्या मुद्यावर वादग्रस्त विधान केले आहे. बागलकोट येथील शिवजयंतीच्या एका कार्यक्रमात प्रमोद यांनी उपस्थित तरुणांना लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुस्लिम तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याची सूचना केली.
मुतालिक पुढे म्हणाले की, असे करणा-या तरुणांच्या नोकरी व सुरक्षेची जबाबदारी श्रीराम सेना उचलेल. मुतालिक यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आमच्या तरुणींना फसवून लव्ह जिहाद केला जात आहे. त्यांनी आमच्या एका मुलीशी लग्न केले, तर हिंदू तरुणांनी त्यांच्या १० तरुणींना फसवावे. असे करणा-यांची नोकरी व सुरक्षेची जबाबदारी श्रीराम सेना घेईल.
आपल्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी प्रत्येकच्या घरी तलवार असली पाहिजे. पोलिसांनी विचारले तर माता दुर्गेच्या हातातही तलवार असल्याचे सांगा. प्रमोद म्हणाले की, आमचे सणवार आले की पोलिस डीजे वाजवण्यास बंदी घालतात. त्यांच्या मशिदींवरून स्पीकर काढण्यात आल्या काय? गो मातेला वाचवण्यासाठी कुणाशीही तडतोड करण्याची गरज नाही. राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू आहे. पण धर्मांतर बंद झाले नाही.