नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भारत-एनसीएपी प्रोग्राम लॉन्च करण्याच्या मसुद्याला मान्यता दिली.
या अंतर्गत कारला त्यांच्या क्रॅश चाचणीतील कामगिरीच्या आधारे स्टार रेटिंग दिले जाणार आहे. गडकरींनी यंदा मार्चमध्ये संसदेत याबद्दल माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी स्टार रेटिंगची चाचणी आणि मूल्यांकन करण्यासाठी एक योजना तयार करत आहे, त्यावर सध्या काम सुरू असल्याचे सांगितले.