28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयराज्यात आयसीएमआरचे अत्याधुनिक चाचणी केंद्र

राज्यात आयसीएमआरचे अत्याधुनिक चाचणी केंद्र

एकमत ऑनलाईन

पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन, उत्तर प्रदेश, प. बंगालमध्येही केंद्र

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्याही त्या प्रमाणात वाढवणे आवश्यक असल्याचे मत यापूर्वी अनेकांनी व्यक्त केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सोमवार, दि. २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यÞांच्या हस्ते आयसीएमआरच्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या केंद्रांचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन सहभागी होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे उपस्थित राहणार आहेत. कोलकात्यात आयसीएमआरचे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ कॉलरा अँड अँट्रिक डिजिज हे पहिले चाचणी केंद्र, नोएडात आयसीएमआरचे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ कॅन्सर प्रिव्हेंट अँड रिसर्च सेंटर, तर मुंबईत आयसीएमआरचे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

तिन्ही केंद्रांमध्ये कोरोनासह अन्य रोगांच्या चाचणा शक्य
या तिन्ही चाचणी केंद्रांमध्ये दररोज १० हजारांपर्यंत कोरोनाच्या चाचण्या करता येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त या केंद्रांमध्ये अन्य आजारांच्या चाचण्याही करता येणार आहेत. यामध्ये हेपेटायटिस बी आणि सी, एचआयव्ही, टिबी, डेंग्यू यांचाही समावेश आहे.
देशात ४ लाखांवर होताहेत चाचण्या
देशात कोरोनाच्या टेस्टचे प्रमाण दिवसेंदिवस वाढविण्यात येत आहे. सुरुवातीला टेस्टचे प्रमाण खूप कमी होते. मात्र, आता रोज चार लाखांवर टेस्ट होत आहेत. रविवारीदेखील ४ लाख ४२ हजार ३१ टेस्ट घेण्यात आल्या. त्यातच केंद्र सरकारने महाराष्ट्रासह तीन राज्यांत आयसीएमआरचे अत्याधुनिक केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने टेस्टचे प्रमाण आणखी वाढण्यास मदत होणार आहे.
मोदींचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद
या अत्याधुनिक चाचणी केंद्रांच्या आॅनलाईन उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या