22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडादुबईच्या म्युझियममध्ये कोहलीचा पुतळा

दुबईच्या म्युझियममध्ये कोहलीचा पुतळा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दुबईतील प्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात विराट कोहलीच्या नवीन मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या नवीन पुतळ्यात, कोहली टीम इंडियाच्या नवीन जर्सी नेव्ही ब्लूमध्ये आहे.

दुबईमध्ये मादाम तुसा संग्रहालयाचे गेल्याच आठवड्यात उद्घाटन करण्यात आले. या संग्रहालयात विराट कोहलीसह इंग्लंडची राणी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅम, अ‍ॅक्शन स्टार जॅकी चेन, फुटबॉलपटू मेस्सी, टॉम क्रुझ, पॉप स्टार रिहाना यांच्या आणि इतर ६० लोकांच्या पुतळ्याचा समावेश आहे.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर, इंग्लंडमधील मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा लावलेला कोहली दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. दरम्यान, जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात कोहलीचा नवीन पुतळा बसवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा २०१८ मध्ये कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण दिल्लीतील मादाम तुसाद संग्रहालयात करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या