24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयप्रसारमाध्यमांच्या दूर राहा!

प्रसारमाध्यमांच्या दूर राहा!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दुस-या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आजपासूनच पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी मोदींनी मंत्रीमंडळातील नवीन सहका-यांना काही सल्ले दिले आहेत. यामध्ये मोदींनी प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असेही सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांपैकी ३६ मंत्र्यांचा पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. गुजरातचे मनसुख मंडाविया हे नवे आरोग्यमंत्री असतील तर, माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नवे शिक्षण मंत्री आहेत. कालच्या शपथविधीनंतर आज लगेचच मोदी २.० टीमने आपले काम सुरू केले. पंतप्रधान मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासहीत आज देशातील वेगवेगळया आयआयटीच्या संचालकांशी चर्चा केली.

कामकाज समजून घ्या
जवळजवळ सर्वच नवीन मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला असून मोदींनी या सर्वांना सूचना करताना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबून आपल्या मंत्रालयाचे काम समजून घ्यावे असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच मोदींनी मंत्रालयाचे कामकाज लवकर सुरु करावे अशा सुचना नवीन सहका-यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका असा सल्लाही मोदींनी या नवीन मंत्र्यांना दिल्याचे समजते.

लॅम्बडा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही जास्त धोकादायक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या