22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयहॉटेलमध्ये राहणे, पनीर खाणे आता महागणार

हॉटेलमध्ये राहणे, पनीर खाणे आता महागणार

एकमत ऑनलाईन

वाढता टॅक्स खिसा कापणार!

चंदिगड : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक चंदीगडमध्ये सुरू आहे. मंगळवारी जीएसटी बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत अनेक गोष्टी जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत.

पॅक दही, पनीर, मध, पापड, लस्सी, ताक आता महाग होणार आहे. दुसरीकडे, १००० रुपयांपेक्षा कमी दर असलेल्या हॉटेल रूमवर १२ टक्के जीएसटी आकारण्याची चर्चा आहे. त्याच वेळी, चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारल्या जाणा-या शुल्कावर १८ टक्के जीएसटी देखील लावला जाईल. सोलर वॉटर हिटरवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची चर्चा आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली, २८ जून २०२२ रोजी जीएसटी काऊंसिलची बैठक सुरु झाली आहे. चंदीगड येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व राज्याचे अर्थमंत्री हजर आहेत. १ जुलै २०२२ रोजी जीएसटी लागू करण्यास ५ वर्षे पूर्ण होतील. या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर जीएसटी परिषदेची ही बैठक होत आहे.

ऐनवेळी श्रीनगर येथे होणारी बैठक रद्द करत, ती चंदिगड येथे ठेवण्यात आली. या बैठकीत काही वस्तूंच्या कर रचनेत बदल होऊ शकतो. तसेच ई-कॉमर्स पुरवठादारांच्या नोंदणी नियमांमध्ये बदल होऊ शकतो. दर सहा महिन्यांनी परिषदेची बैठक होते.

पहिल्या दिवसाच्या बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयानुसार दही, चीज, मध, मांस आणि मासे यासारख्या कॅन केलेल्या आणि लेबल किंवा ब्रँडेड वस्तू महाग होणार आहेत. दुसरीकडे हॉटेलमध्ये राहणेही महागणार आहे.
———————

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या