मुंबई : देशातील वाढती महागाई, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक आणि अमेरिकेतील फेडरल बँकेने वाढवलेले व्याजदर याचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला. परिणामी शेअर बाजार गटांगळ््या खात चांगलाच आपटला. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,०४५ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३३१ अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये २.०२ टक्क्यांची घसरण होऊन तो ५१,४७९ अंकांवर स्थिरावला, तर निफ्टीत २.१९ टक्क्यांची घसरण होऊन तो १५,५७१ अंकांवर स्थिरावला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हा गेल्या ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळीवर घसरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत आज ४५ सेंट्सची घसरण झाली असून ती ११८.०६ डॉलर्सवर स्थिरावली आहे. अमेरिकेत महागाईच्या दराने गेल्या ४० वर्षातील नीचांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केलीे. फेडरल रिझर्व्हने ०.७५ टक्के वाढ केली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर गुंतवणुकीची सपाटा
यासोबतच परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरू आहे. या महिन्यात भारतीय बाजारातून १४,००० कोटी रुपये काढले आहेत.