24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीय३०० किलो हेरॉईनसह एके ४७ चा साठा जप्त

३०० किलो हेरॉईनसह एके ४७ चा साठा जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : चेन्नई झोनल नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो युनिटने मोठी कारवाई केली आहे. श्रीलंकेच्या एका बोटमधून ३०० किलो हेरॉईन ड्रग्स मोठया प्रमाणात आणि एके ४७ बंदुकी जप्त केल्या आहेत. या कारवाईचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचे देखील समोर आले आहे. चेन्नईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो युनिटला माहिती मिळाली की श्रीलंकेमधून एका बोटीमध्ये ड्रग्स आणि हत्यारे भारतात येणार आहेत. त्याप्रमाणे चेन्नई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने भारतीय तटरक्षक दलात बरोबर सापळा रचला आणि श्रीलंकेमधून येणाºया बोटीला ताब्यात घेतले. ज्यामध्ये ३०० किलो हेरॉईन मोठ्या प्रमाणात हत्यारे होती. तसेच ६ श्रीलंकन नागरिकांना सुद्धा चेन्नई नार्कोटिक्सच्या टीमने अटक केली आहे.

श्रीलंकेमधून रवीहंसी नावाची बोट भारतात येणार याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. भारताच्या हद्दीत बोट येताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने त्या बोटला अडवले. बोटची जेव्हा झडती घेण्यात आली़ तेव्हा संपूर्ण बोल पिवर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये ३०१ पाकीटे मिळाल़ ज्यामध्ये सफेद रंगाची पावडर होती, जी कोकेन होती. पॅकेटवर घोड्याचे चित्र होते. ड्रग्सच्या ब्रॅण्डिंगसाठी हे असे चित्र वापरण्यात येत असल्याचे चेन्नई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे डायरेक्टर अमित घवाते यांनी सांगितलं. तर पाच एके४७ आणि १००० गोळ्या सुद्धा चेन्नई एनसीबीने या बोटवरून जप्त केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

पार्सल आले इराणवरुन
बोट वर सापडलेले ड्रग्स आणि हत्यारांचे पार्सल चाबाहार बंदर इराणवरून आले होते़ ते पार्सल श्रीलंकेच्या बोटवर लक्ष्यदीप येथील समुद्री भागात ठेवण्यात आले. जे श्रीलंकेत नेण्यात येणार होते, मात्र त्या आधीच चेन्नई कंट्रोल समुद्रामध्ये कारवाई करत बोट आपल्या ताब्यात घेतली. ही बोट भारतीय हद्दीतून श्रीलंकेला जाणार होती.

६ श्रीलंकन नागरिक अटकेत
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव एल वाय नंदाना, एचकेजीबी दासपप्रिया, अऌर गुणसेकरा, एसएएस सेनारथ, टी रानासिंगा, डी निससंका असून, हे सर्व श्रीलंकेचे नागरिक आहेत. यांना २७ मार्चला अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाक कनेक्शन उघड
आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये जे ड्रग्स आणि हत्यार चेन्नई एनसीबीने पकडली आहेत़ त्यांचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर याआधी सुद्धा अरब महासागरात अशाप्रकारे ज्या कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानचे कनेक्शन स्पष्ट झाले होते़ या कारवाईमुळे ड्रग माफिया आणि अतिरेकी घटकांचे कनेक्शन उघड झाले असून तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील रस्ते निर्मितीसाठी २,७८० कोटी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या