27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeराष्ट्रीयसूरतमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या रोड शो वर दगडफेक

सूरतमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या रोड शो वर दगडफेक

एकमत ऑनलाईन

सूरत : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष प्रचारात गुंतले आहेत. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यामध्ये प्रामुख्याने ही लढत होत आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज गुजरातमधील सूरत येथे रोड शो करत होते. यावेळी त्यांच्यावर काहीजणांकडून दगडफेक करण्यात आली.

रोड शोचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही टार्गेट करण्यात आले. माध्यमांच्या कॅमे-यावरदेखील दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक सुरु झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आपल्या गाडीत जाऊन बसले. काही वेळाने सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला रोड शो सुरु केला.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या