24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआरोपींना भरचौकात दगडांनी मारून टाका

आरोपींना भरचौकात दगडांनी मारून टाका

एकमत ऑनलाईन

मुरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. एस. टी. हसन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. लखीमपूर खेरी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुस्लिम आरोपींना चौकाचौकात अर्ध्यावर गाडून त्यांना दगडांनी मारून शिक्षा करण्याची मागणी केलीय. जेणेकरून भविष्यात कोणीही बलात्काराचा प्रयत्न करणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

सपा खासदार सय्यद तुफैल हसन यांनी मागणी केलीय की लखीमपूर खेरी सामूहिक बलात्कार आणि हत्येमध्ये सहभागी असलेल्या मुस्लिम आरोपींना अशी शिक्षा द्यावी, जेणेकरुन अन्य मुस्लिम अशी घटना कधीच घडवणार नाहीत. मुस्लिम आरोपींना भरचौकात अर्ध्यावर गाडून त्यांना दगडांनी मारावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या