30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयचिनी आयात टप्प्याटप्प्याने थांबवा

चिनी आयात टप्प्याटप्प्याने थांबवा

एकमत ऑनलाईन

मुंबई : चिनी मालाच्या वापरासंदर्भात सर्वत्र दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. चिनी माल वापरणे, चिनी अ‍ॅप वापरणे याचबरोबर चिनी वस्तूंची आयात थांबवणे यासारखे निर्णय घेतले जात आहेत. मात्र चिनी आयात एकदम न थांबवता, टप्प्याटप्प्याने थांबवावी, असे मत एसबीआयच्या इकोरॅप या अहवालात बुधवारी व्यक्त करण्यात आले.

इकोरॅपच्या निरीक्षणानुसार, केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यामुळे देशातील आयटी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या क्षेत्राला स्वत:च्या क्षमता विकसित करण्यास यामुळे मोठा वाव मिळणार आहे. कमी किंमतीची औद्योगिक उत्पादने, मोठ्या ंिकमतीची यंत्रसामग्री व इलेक्ट्रिक उपकरणे यांची आयात मोठ्या प्रमाणावर चीनमधून केली जात आहे. या सर्व वस्तूंमध्ये भारतीय उत्पादक चीनशी समर्थपणे स्पर्धा करू शकतात.

सध्या दूरसंचार, कम्प्युटर, माहिती सेवा यांची मोठ्या प्रामणात जगभरात भारतातून निर्यात केली जात आहे. तरीही चीन बारताची बरोबरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. चीनचे हे प्रयत्न वेळीच ओळखून त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. देशातील एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी भारताने आयात होणारÞ्या काही उत्पादनांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे, याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

कॅटची यादी ११ नोव्हेंबरपर्यंत होईल तयार
चीनला धडा शिकवण्यासाठी देशात सध्या चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन दिले जाते आहे. या पार्श्वभूमीवर कॅट या किरकोळ व्यापा-यांच्या संघटनेने एक योजना तयार केली असून त्यांनी संपूर्ण देशातील सदस्यांना एक पत्र दिले आहे. कॅटने एक यादीच तयार करत आहे. ही यादी ११ नोव्हेंबरपर्यंत तयार होईल. सदस्यांना लिहलेल्या पत्रात कॅटने सर्व राज्यातील आणि अन्य मुख्य व्यापारी संघटना यांना सल्ला दिला आहे की त्यांनी फक्त भारतीय वस्तू निर्मिती करणा-यांकडून वस्तू विकत घ्याव्यात. यात महिला उद्योग, स्टार्टअप आदींचा समावेश आहे.

अशी आहे आयात
१९९६-९७ मध्ये २२ गटांत भारताने चीनकडून कोणतीही वस्तू घेतली नव्हती. २०१९-२० मात्र चिनी मालाची आयात ५० कोटी डॉलर्सची झाली. या वर्षात ६,८४४ चिनी उत्पादनांची आयात करण्यात आली.

Read More  विनाकारण फिरणा-यांविरोधात पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या