16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयसिगारेट ओढण्यास मज्जाव; तरुणाचा खून

सिगारेट ओढण्यास मज्जाव; तरुणाचा खून

एकमत ऑनलाईन

देवास : पेट्रोल पंपावर सिगारेट ओढण्यास मज्जाव करणा-या कर्मचा-याचाच चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार मध्यप्रदेशातील देवास जिह्यात घडला. त्यानंतर संतप्त जमावाने आंदोलन करीत आरोपीचे घर आणि त्याचा ढाबा जमिनदोस्त केला. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

पेट्रोलपंपावरील हा खून सीसीटिव्ही कॅमेरातही कैद झाला असून या आरोपीचा ढाबा देखील बेकायदेशीरपणे बांधलेला होता. तो जमावाने उध्वस्त केला. दिवाळीच्या रात्री ११ वाजता जेतपुराजवळील भोपाळ रोडवरच्या सूर्यांश सेल्स पेट्रोल पंपावर पाच तरुण पेट्रोल घेण्यासाठी आले. यावेळी तरुणांनी तेथे सिगारेट पेटवली. हे पाहून पेट्रोल पंप कर्मचारी राहुल याने त्याला सिगारेट ओढण्यापासून मज्जाव केला. यावर तरुण संतापले आणि त्यांनी वाद घातला. तिथे जोजनसिंग धावत आले. आरोपींनी दोघांवर चाकूने हल्ला केला. चाकू हल्ल्यात जोजन सिंगचा मृत्यू झाला. तर राहुल जखमी झाला. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत समीर, फैजान, फारुख, जफर आणि इर्शाद या पाच आरोपींना अटक केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या