30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय शबनमची फाशी थांबवा - महंत परमहंस दास

शबनमची फाशी थांबवा – महंत परमहंस दास

एकमत ऑनलाईन

अयोध्या : प्रेमासाठी शिक्षिका असलेल्या शबनमने घरातीलच ७ लोकांची क्रूरपणे हत्या केली होती. कारण हे तिच्या घरातील लोक तिच्या प्रेमाच्या विरोधात होते. ती सलीम नावाच्या एका आठवी पास तरूणावर प्रेम करत होती. यूपीतील अमरोहा येथील बहुचर्चीत हत्याकांडातील दोषी शबनमच्या डेथ वॉरन्टवर कोणत्याही क्षणी हस्ताक्षर होऊ शकतात. लवकरच शबनमला मथुरा येथील तुरूंगात फासावर लटकवले जाऊ शकते. मात्र, अशातच शबनमचा मुलगा ताजने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या आईची फाशीची शिक्षा माफ करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे महंत परमहंस दास यांनी देखील राष्ट्रपतींना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी आवाहन केले आहे.

अयोध्या येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्याचे आवाहन केले आहे. जर शबनमला फाशी देण्यात आली तर स्वातंर्त्यानंतर महिलेला फाशी देण्याची ही पहिलीच घटना असेल. महंत परमहंस दास यांनी सांगितले की, हिंदू धर्मग्रंथात स्त्रीला पुरुषांपेक्षा खूपच महत्वाचे स्थान दिले आहे. स्त्रीच्या मृत्यूचा फायदा समाजाला होणार नाही, तर दुर्दैवी आणि आपत्तींना निमंत्रण द्याल. तिचा गुन्हा माफ करण्यायोग्य नाही, परंतु स्त्री म्हणून तिला क्षमा केले पाहिजे हे खरे आहे.

महिलेला फाशी देणे दुर्भाग्यपूर्ण
महंत पुढे म्हणाले, हिंदू धर्माचे गुरू असल्याने मी राष्ट्रपतींना शबनम यांची दया याचिका स्वीकारण्याचे आवाहन करतो. तुरुंगात तिच्या गुन्ह्याबद्दल तिने प्रायश्चित भोगले आहे. जर तिला फाशी देण्यात आली तर, हा इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण अध्याय असेल. आमची राज्यघटना राष्ट्रपतींना विलक्षण अधिकार देते, त्यांनी या अधिकारांचा उपयोग माफी देण्यासाठी करायला हवा.

सोनिया, राहुल गांधींना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या