25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeराष्ट्रीयआता दगडफेक करणा-यांवर कठोर कारवाई

आता दगडफेक करणा-यांवर कठोर कारवाई

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरातीलदगडफेक करणा-यांवर सीआयडीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. दगडफेकीसारख्या घटनांमध्ये सामील तरुणांना सरकारी नोकरी मिळणार नाही. तसेच, त्यांचे पासपोर्ट व्हेरिफीकेशनदखील होणार नाही. काश्मीर सीआयडीने यासंबंधी एक सर्कुलर जारी केले आहे. यात दगडफेकीसारख्या घटनांमध्ये सामील तरुणांना सिक्टोरिटी क्लिअरन्स न देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

काश्मिर सीआयडीच्या एसएसपींनी हे सर्कुलर जारी केले आहे. यात म्हटले की, यापुढे पासपोर्ट, सरकारी नोकरी किंवा सरकारी योजनांचे क्लिअरन्स देताना विशेष काळजी घ्यावी लागेल. राज्यात दगडफेक किंवा त्यासारख्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींना क्लिअरन्स दिला जाऊ नये.

कारवायांचीही नोंद घेतल्या जाणार
व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी संबंधीत पोलिस स्टेशनमधून त्या व्यक्तीची माहितीदखील मिळवली जाईल. त्याशिवाय, सुरक्षा एजंसीकडे त्या व्यक्तीचे फोटो, व्हीडीओ फुटेज किंवा ऑडियो असतात. याच्या मदतीने त्या व्यक्तीचा अशा कारवायांमध्ये सहभाग आहे का, याची नोंदही घेतली जाईल.

देशात ४१ हजार ८३१ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या