22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयमिझोरम, तामीळनाडूत कडक लॉकडाऊन

मिझोरम, तामीळनाडूत कडक लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

चेन्नई : कोरोनाचे वाढते रुग्ण आणि होणारा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान देश आणि राज्यांपुढे आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेक राज्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे राज्यांना लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे. आता मिझोरम आणि तामिळनाडु या दोन राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मिझोरमने ७ दिवसांचा तर तामिळनाडुने १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

मिझोरममध्ये १० मे पासून सकाळी ४ ते १७ मे पर्यंत सकाळी ४ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. यावेळी राज्यसीमा खुल्या असणार आहेत. राज्यात येणा-या प्रवाशांना सीमेवर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर १० दिवस आयसोलेशनमध्ये राहणे बंधनकारक असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मॉल्स आणि दुकाने बंद असणार आहेत.

तामिळनाडुतही १० मे पासून २४ मे पर्यंत १४ दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत किराणा दुकाने, भाज्या, मास आणि मासे विक्री करणारी दुकानांना सूट देण्यात आली आहे. शनिवार रविवार सर्व दुकाने सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलमधून पार्सल सेवा सुरु राहील. मात्र दारूची दुकाने पूर्णपणे बंद असतील असे आदेशात सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेत असण्या-यांना यात सूट देण्यात आली आहे.

संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या