22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयमाता-भगिनींच्या सन्मानाला ठेच पोहोचविणाऱ्याला कठोर शिक्षा: योगी आदित्यनाथ

माता-भगिनींच्या सन्मानाला ठेच पोहोचविणाऱ्याला कठोर शिक्षा: योगी आदित्यनाथ

एकमत ऑनलाईन

लखनौ: महिलांची सुरक्षा हा आपल्या सरकारचा संकल्प असून माता-भगिनींच्या सन्मानाला ठेच पोहोचविणाऱ्यांना अशी कठोर शिक्षा करी की पुढील काळात त्याकडे उदाहरण म्हणून पहिले जाईल, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. हाथरस लैगिक अत्याचार आणि खून प्रकरणावर योगी यांनी प्रथमच ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हाथरस प्रकरणावरून योगी सरकारला सर्वच विरोधी पक्षांनी धारेवर धरले आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोडियांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही विरोधकांनी धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखणे आणि पीडितेच्या मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार यामुळे उत्तर प्रदेश सरकार काही तरी लपवू पाहत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा ! – देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या