27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयउत्तर भारताला तीव्र भूकंपाचे धक्के

उत्तर भारताला तीव्र भूकंपाचे धक्के

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर भारत भूंकपाच्या तीव्र धक्क्याने हादरला. दिल्ली-एनसीआरसह काश्मिरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात असल्याचे सांगण्यात येत आहे. भूंकपाची तीव्रता ५.९ रिश्टल स्केल इतकी नोंदवली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रंिबदू अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये जमिनीपासून २०० किमी खाली होता.

संध्याकाळी ७ वाजून ५६ मिनिटांनी भूकंपाचे हदारे बसले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधीही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. दिल्लीत गेल्या एका आठवड्यात दुस-यांदा भूकंपाचा धक्का जाणवला. उत्तर भारताबरोबरच पाकिस्तान, अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले.

नव्या वर्षाच्या पहिल्याच रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये ३.८ रिश्टल स्केल भूकंपाचा धक्का जाणवला होता. हरियाणातल्या झज्जर इथे भूकंपाचा केंद्रंिबदूची नोंद करण्यात आली होती. जमिनीपासून ५ किलोमीटर खाली भूकंपाचा धक्का जाणवला. याआधी १२ नोव्हेंबरला दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या धक्क्याने हादरली होती. यावेळी भूकंपाची तीव्रता ५.४ इतकी होती, आणि याचा केंद्र ंिबदू नेपाळ होता.

दिल्ली-एनसीआर हा भूंकप संवेदनशील परिसर मानला जातो. तीव्र भूकंपा आल्यास इथे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होऊ शकते. त्यातच आता आठवडाभरात दुस-यांदा भूकंपाचा हादरा बसल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावण पसरलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या