हैदराबाद : कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नैराश्यग्रस्त होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. शिक्षण बंद झाले म्हणून दिल्लीतील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयात शिक्षण घेणा-या परंतू मूळ तेलंगणाची रहिवासी असलेल्या एका विद्यार्थिनीने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्याची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या रेड्डी हिने दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयापर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या कष्टाने पाऊल टाकले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे तिची शिक्षणाची आशाच संपुष्टात आली. अखेर २ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ऐश्वर्याचे वडील श्रीनिवास रेड्डी हे आॅटो मॅकेनिक म्हणून काम करतात. तर आई घरीच कपडे शिवण्याचे काम करत घराला आर्थिक हातभार लावतात. खूप शिकून आयएएस बनण्याचा ध्यास ऐश्वर्याने घेतला होता. परंतु, कोरोना संकटाने आणि लॉकडाऊनने तिच्या या स्वप्नांना पार धुळीत मिळवून टाकले.
कमला हॅरिसची मोदींनी खुशमस्करी करु नये