18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयशाळेसाठी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयात

शाळेसाठी विद्यार्थी सर्वाेच्च न्यायालयात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरातील शाळा सुरु करण्यात याव्यात यासाठी एका विद्यार्थ्याने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण न्यायालयाने त्याच्या याचिकेवर सुनावणीला नकार दिला. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने अभ्यासकडे लक्ष द्यावे असा सल्ला त्याला न्यायालयाने दिला. राज्य सरकारे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेत असल्याचेही यावेळी न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्लीतील रहिवासी असलेल्या एका बारावीतील विद्यार्थाने देशभरातील शाळा उघडण्यात याव्यात यासाठी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका आज सुनावणीसाठी कोर्टासमोर आली मात्र, न्यायालयात सुनावणीस नकार दिला. यावेळी सुनावणी करणारे न्या. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन शिक्षण सुरु करण्यासाठी पुन्हा शाळा सुरु करण्याचे आदेश आम्ही देऊ शकत नाही. कारण नेमका धोका कुठे असेल हे आम्ही सांगू शकत नाही.

शाळा सुरू व्हाव्यात यात शंका नाही
कोणत्या जिल्ह्यात सध्या कोविडच्या घटना अधिक आहेत, हे ही आम्हाला माहिती नाही. मुलांनी आता पुन्हा शाळेत जायला हवे यात काही शंका नाही. पण हे राज्य सरकारांनी निश्चित करणे गरजेचे आहे. हा असा मुद्दा आहे ज्याची जबाबदारी राज्यांवर सोपवणे योग्य राहील असे न्यायालयाने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या