23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीययुक्रेनमधून परतलेले विद्यार्थी जगात कोठेही शिक्षण पूर्ण करू शकणार

युक्रेनमधून परतलेले विद्यार्थी जगात कोठेही शिक्षण पूर्ण करू शकणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या युध्दात भारतीय विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आता जगातील कोणत्याही देशातील विद्यापीठातून एमबीबीएस पूर्ण करण्याची परवानगी दिली जाणार आहे. विद्यार्थांची परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने याबाबत आदेश जारी केला आहे.

युक्रेनने देऊ केलेल्या शैक्षणिक गतिशीलता कार्यक्रमाला मान्यता देण्यास सहमत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या मूळ विद्यापीठातूनच पदव्या दिल्या जातील. रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिकणा-या अनेक भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागले. अशा स्थितीत या विद्यार्थ्यांचा अभ्यास रखडला आहे. मात्र आता एएमसीच्या या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एनएमसी कायदा काय म्हणतो?
एनएमसी कायद्यानुसार, परदेशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करून एकाच विद्यापीठातून पदवी घेणे बंधनकारक आहे. एनएमसीकडून प्रसिध्द केलेल्या नोटीसमध्ये सांगितल की युक्रेनने जाहीर केलेल्या कार्यक्रमावर परराष्ट्र मंत्रालयाशी सल्लामसलत करून विचार केला गेला आहे, ज्यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की शैक्षणिक कार्यक्रमचे जागतिक स्तरावर विविध देशांतील इतर विद्यापीठांमध्ये तात्पुरते हस्तांतरण केले आहे.

युक्रेन विद्यापीठातूनच मिळणार डिग्री
एनएमसीच्या अधिका-यांनी नोटीसमध्ये सांगितले आहे की युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थांना देशातील कोणत्याही कॉलेजमधून करता येणार आहे, पण डिग्री मात्र युक्रेन विद्यापीठातूनच मिळणार आहे. सार्वजनिक नोटीसमध्ये सांगितले की युक्रेनमध्ये शिकत असलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात आयोगाने शैक्षणिक गतिशीलता कार्यक्रमास हरकत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या