27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयपंधरा दिवसांत योजना सादर करा; केंद्राच्या स्विगी-झोमॅटोला सूचना

पंधरा दिवसांत योजना सादर करा; केंद्राच्या स्विगी-झोमॅटोला सूचना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांना ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुधारण्यासाठी १५ दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.

ग्राहक व्यवहार विभागाने आघाडीच्या ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना विद्यमान फ्रेमवर्क तसेच ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुधारण्यासाठी १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख एफबीओसोबत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या क्षेत्रातील ग्राहकांवर परिणाम करणा-या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

गेल्या १२ महिन्यांत राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन(१९१५) वर स्विगीसाठी ३,६३१ हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी झोमॅटोबाबत २,८२८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, केंद्राच्या या आदशानंतर संबंधित कंपन्या कशा प्रकारच्या योजनांबाबत सादर करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या