कोळशामुळे वीज व लघु उद्योग उभारण्यासही मदत
नवी दिल्ली : कुंडिलपूरचे निवासी रामेश्वर कुशवाह यांना राखेपासून तयार केलेल्या कोळशाचे भारत सरकारकडून पेटंट मिळाले आहे. यासह, पश्चिम चंपारणमध्ये बनवलेल्या कोळशाच्या ब्रिकेटसह देशातील गरीबांच्या घरात जेवण तयार करण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. या कोळशामुळे वीज व लघु उद्योग उभारण्यासही मदत होईल.
रामेश्वर कुशवाहा यांनी सांगितले की, सरकारने त्यांच्या 8 वर्षांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब केला आहे. आता तेदेखील औद्योगिक दृष्टिकोनातून देश बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 2012 पासून कुशवाहा या संशोधनासाठी प्रयत्न करीत होते. आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर राखेतून कोळसा तयार करण्यात त्यांना यश आलं आहे.
Read More लगाम पवारांच्या हाती, तरीही राज्य सरकार अपयशी- राजनाथ सिंह
त्यांचं अथक परिश्रम पाहून तत्कालीन पशुसंवर्धन राज्यमंत्री गिरीराज सिंह यांच्यासह ऊस उद्योग विभागाचे अधिकारी, टांझानिया, युगांडाचे संशोधक मांझरिया गावात पोहोचले आणि आश्चर्यचकित झाले. त्यांनी रामेश्वरला आपल्या देशात एक प्लांट लावून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पण रामेश्वर यांनी त्यांची ऑफर फेटाळून लावली.
कसा तयार केला राखेपासून कोळसा : तांदूळ गिरणीतील कचरा, पेंढा आणि वाळलेल्या ऊसाची पाने मिसळून कोळशाच्या ब्रिकेट बनवल्या जातात. त्याची किंमत खूप कमी आहे. आणि हे जाळल्याने प्रदूषण पसरणार नाही. कोणताही वास येणार नाही. कोळशाच्या वापरानंतर मिळणारी राख शेतात खत म्हणून काम करेल.