29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीय‘नाग’ या अ‍ॅन्टी टँक गायडेड क्षेपणास्राचे यशस्वी प्रक्षेपण

‘नाग’ या अ‍ॅन्टी टँक गायडेड क्षेपणास्राचे यशस्वी प्रक्षेपण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने गुरुवारी पहाटे सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे यश मिळवले आहे. राजस्थानच्या पोखरण भागात ‘नाग’ या अ‍ॅन्टी टँक मार्गदर्शक क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. या क्षेपणास्राची चाचणी वॉरहेडसहीत करण्यात आली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ) ने या क्षेपणास्राची निर्मिती केली आहे. पोखरणमध्ये गुरुवारी सकाळी ६.४५ वाजता चाचणी करण्यात आली.
नाग क्षेपणास्र संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. तसेच या प्रकारच्या मिसाईल निर्मितीमध्ये भारताने हे तिस-या पिढीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यापूर्वीही ‘नाग’ क्षेपणास्राच्या याआधीही अनेक चाचण्या घेतल्या आहेत. वर्ष २०१७, २०१८ आणि २०१९ मध्येही वेगवेगळ्या पद्धतीच्या नाग क्षेपणास्रांची चाचणी केली होती. नाग क्षेपणास्र हे अचूक पद्धतीने शत्रूच्या रणगाड्यावर हल्ला करु शकते. या क्षेपणास्त्राचे वजनही खूपच हलके आहे.

‘नाग’ क्षेपणास्राच्या मदतीने शत्रूच्या रणगाड्याप्रमाणे इतरही सैन्य वाहनांना काही सेकंदात नष्ट करता येते. या क्षेपणास्त्राच्या मध्यम आणि लहान रेंजच्या आवृत्तीही आहेत. त्यामुळे लढाऊ विमाने, युद्ध नौका, यांच्यासहीत इतर अनेक संसाधनांसहीत ही क्षेपणास्र जोडली जाऊ शकतात. भारत – चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून गेल्या महिनाभरात वेगवेगळ्या पद्धतीच्या अर्ध्या डझनहून अधिक स्वदेशी क्षेपणास्रांची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.

मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचा-यांना बोनस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या