नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०२१ मधील पहिले प्रेक्षपण यशस्वीरित्या केलेले आहे. आज (रविवारी) सकाळी १०.२४ वाजता श्रीहरी कोटा, सतिश धवन स्पेस सेंटर येथून हे प्रेक्षपण केले आहे. श्रीहरी कोटा स्पेपपोर्टच्या प्रेक्षपण पॅडमधून पहिल्यांदाच भारतीय रॉकेट ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या अमेझोनिया-१ उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे.
या उपग्रहाला सतीश धवन असे नाव देण्यात आले असून त्याला एसडी सॅट असेही म्हटलं आहे. त्यात २५ हजार लोकांनी नावे अंतराळात पाठवणार आहेत. नॅनो सॅटेलाइटमध्ये भगवतगीतेची एक प्रत एसडी कार्डच्या स्वरुपात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वरच्या पॅनेलवर कोरले आहे. हा नरेंद्र मोदीच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे.
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के.शिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर. उमामहेश्वरन यांची नावे तळावरील पॅनेलवर कोरलेली आहेत. पीएसएलव्ही-सी ५१ रॉकेट हे पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) चे ५३ वे मिशन आहे, यात ब्राझीलचा अमेझोनिया-१ हा प्राथमिक उपग्रह आहे आणि इतर १८ पेलोड आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या पहिल्या लॉन्चपॅडवरून हे प्रक्षेपित करण्यात आले.
ब्राझील संघाचे अभिनंदन
प्रक्षेपणानंतर ब्राझिलियन संघाचे अभिनंदन करताना इस्रोचे प्रमुख के शिवन म्हणाले की, या मोहिमेमध्ये ब्राझीलच्या पहिल्या उपग्रहाचे प्रेक्षपण केले गेले, याचा भारताला आणि इस्त्रोला अत्यंत अभिमान आहे. उपग्रहाची स्थिती योग्य आहे. मी ब्राझीलच्या संघाचे अभिनंदन करतो.
हत्येप्रकरणी चक्क कोंबड्याला झाली अटक