22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयभारताकडून क्युआरएसएएम क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

भारताकडून क्युआरएसएएम क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

एकमत ऑनलाईन

बालासोर: भारत आपल्या शत्रुंच्या उरात धडकी भरण्यासाठी सातत्याने अद्ययावत क्षेपणास्त्रांचे परीक्षण करीत आहे. या मालिकेतच शनिवारी भारताने हे परीक्षण ओडिशाच्या आयटीआर चांदीपूर परीक्षण रेंज येथे क्युएसआरएएम या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले. परीक्षण स्थळावरुन डागलेल्या या क्षेपणास्त्राने क्षणार्धात लक्ष्यभेद केला. दुपारी ३.५० वाजता हे यशस्वी क्षेपणास्त्र परीक्षण केले गेले.

क्युएसआरएएम हे क्षेपणास्त्र सिंगल स्टेज सॉलिड प्रोपलेंट रॉकेट मोटरद्वारे संचलित आहे. क्षेपणास्त्राच्या सर्व प्रणाली स्वदेशनिर्मित आहेत. बॅटरी मल्टिफंक्शन रडार, बॅटरी सर्व्हिलन्स रडार, बॅटरी कमांड पोस्ट वेहिकल आणि मोबाइल लाँचर ही क्युएसआरएएम मध्ये वापरण्यात आलेली सर्व उपकरणे स्वदेशी आहेत. आकाशात गतीमान असलेल्या लक्ष्यालाही अचूकपणे टिपण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.हे क्षेपणास्त्र लक्ष्य शोधून त्याच्यावर नजर ठेवते. तसेच त्याचा अचुक माग काढून क्षणार्धात त्याला उद्ध्वस्त करू शकते. ही प्रणाली भारतीय लष्कराच्या हल्ला करणा-या तुकडीला हवाई संरक्षण प्रदान करण्यासाठी खास उपयोगी ठरणार आहे.

सर्व प्रकारच्या रणक्षेत्रावर उपयुक्त
क्षेपणास्त्र एका जमिनीवरून मारा करू शकणा-या मोटरद्वारे डागले गेले, त्यामुळे लष्कराला कोणत्याही प्रकारच्या रणक्षेत्रावर सहज वापर करता येणार आहे. क्षेपणास्त्र मोबाइल प्रक्षेपणाचा वापर करत डागले जाऊ शकते.

क्षणार्धात लक्ष्य उद्ध्वस्त
परीक्षणासाठी क्युएसआरएएम हत्यार प्रणालीच्या बॅटरी, मल्टिटास्किंग रडार, बॅटरी देखरेख रडार, बॅटरी कमांड पोस्ट यान आणि मोबाइल प्रक्षेपक तैनात करण्यात आले होते. रडारने दूरूनच लक्ष्य ओळखले आणि ते मारक सीमेत आल्यानंतर क्षेपणास्त्र डागले गेले. या क्षेपणास्त्राने थेट लक्ष्यावर प्रहार केले आणि त्याला उद्ध्वस्त करून टाकले.

संपुर्ण स्वदेशी व अत्याधुनिक
डीआरडीएल, आरसीआय, एलआरडीई, आरअँडडीई (ई), आयआरडीई आणि आयटीआरसारख्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या विविध प्रयोगशाळांनी या परीक्षणात भाग घेतला. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी आहे आणि यात इलेक्ट्रो मॅकॅनिकल अ‍ॅक्च्युएशन (ईएमए) सक्रिय आरएफस्पीकर ही

प्रणाली बसवण्यात आली आहे.
यशस्वी परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, डीडीआरअँडडीचे सचिव आणि डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी यशस्वी परीक्षणाबाबत डीआरडीओच्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.

भडाग्णीला मुलगा आलाच नाही; मुलीनेच केला विधी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या