25.9 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeराष्ट्रीयगोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू

गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू

एकमत ऑनलाईन

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एका गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गायींचा मृत्यू चा-यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

तपास अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे जिल्हाधिकारी कुतेंद्र कवर यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सरदारशहरमधील बिल्युबास रामपुरा येथील श्री राम गोशाळेतील आहे. अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सायंकाळपासून या गोशाळामध्ये ८० गायींचा मृत्यू झाला, तर अन्य काही आजारी आहेत. पशुसंवर्धन व वैद्यकीय विभागाच्या पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

‘रामकली’ रागाने दिवाळी पहाट बनली सुरेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या