25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeराष्ट्रीयसाखर कामगार ३० पासून बेमुदत संपावर

साखर कामगार ३० पासून बेमुदत संपावर

एकमत ऑनलाईन

सांगली : पगार वाढ व सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील साखर कामगार हे येत्या ३० नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. दीड लाख साखर कामगार या आंदोलनात उतरणार असल्याची माहिती साखर कामगार युनियन कडून देण्यात आलेली आहे. गेल्या चौदा महिन्यांपासून राज्यातील साखर कामगारांचे करार प्रलंबित आहेत. राज्य सरकार आणि साखर संघाकडे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पाठ पुरावा करण्यात येत आहे.

साखर कामगारांच्या मागण्यांकडे आतापर्यत दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्यात साखर कारखानदारांची सत्ता आल्यावर किमान कामगारांना न्याय मिळेल,अशी अपेक्षा होती.मात्र राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या त्याबाबतीत दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली,असा आरोप कामगार युनियनकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता कामगारांच्या समोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याने येत्या ३० नोव्हेंबर पासून राज्यातल्या सर्व साखर कारखान्याचे कामगार बेमुदत संपावर जातील अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार युनियन कडून देण्यात आली आहे.सांगलीमध्ये राज्याच्या कामगार युनियनच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

अमेरिकन निकालांचे त्रांगडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या