27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयआत्मघाती हल्ल्याचा कट : ISIS दहशतवाद्याच्या घरातून मिळाले २ सुसाईड बॉम्ब जॅकेट

आत्मघाती हल्ल्याचा कट : ISIS दहशतवाद्याच्या घरातून मिळाले २ सुसाईड बॉम्ब जॅकेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली 23 ऑगस्ट: राजधानी दिल्लील्या धौलाकुआं भागातून अटक केलेल्या आयएसआयएस (ISIS) च्या दहशतवादाच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला आहे. या स्फोटकांचा वापर करून दिल्लीला दाहरविण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी अबू यूसुफ उर्फ मुस्तकीम याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापे घातले त्यात हा शस्त्रसाठा सापडला आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम या प्रकरणाचा तपास करत असून त्यातून अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर येत आहेत.

पोलिसांनी धाडी टाकून जेव्हा हा साठ जप्त केला तेव्हा त्यांना ही धक्कादायक गोष्टी समजली. दिल्लीत एकाच वेळी दोन स्फोट घडविण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने दोन प्रेशर कुकरही आणलेले होते. त्यात 5 किलो स्फोटकं भरून त्याचा बॉम्ब करण्यात आला होत. त्याला टायमरही लावण्यात आले होते. त्यामुळे हा कट मोठा होता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

दहशतवाद्यांनी देशभर आपले स्लिपर्स सेल तयार केले आहेत. त्यांना फक्त दिल्लीतच बॉम्ब स्फोट घडवायचे नव्हते तर सर्व देशभर स्फोट घडविण्याची त्यांची योजना होती अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गन पावडरही जप्त केली. शेकडो लोकांचा बळी घेण्याची क्षमता या गन पावडरमध्ये आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. दिल्लीत स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याच अतिरेक्यांचा डाव असल्याचा अलर्ट पोलिसांनी दिला होता.

स्फोटक साहित्यही जप्त; अबू युसूफची चौकशी

याशिवाय पोलिसांनी अबू युसूफच्या घरातून आयएसआयए या दहशतवादी संघटनेचा एक झेंडा आणि स्फोटकांचे साहित्यही जप्त केले आहे. पोलीस सतत अबू युसूफची चौकशी करत आहेत आणि त्याच्या सहकाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. पोलीस आणि एटीएस त्याच्या अड्ड्यांवर छापे टाकत आहेत. अबूच्या कुटुंबियात त्याची पत्नी आणि चार मुले आहे. काही काळ सौदी अरेबियात नोकरी केल्यानंतर त्याने आपल्या गावात सौंदर्यप्रसाधनांचे दुकान सुरू केले होते. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या दहशतवादी वरिष्ठांशी संपर्कात राहायचा.

‘लोन वुल्फ’ हल्ला हा दहशतवादी हल्ल्याचा नवा प्रकार

पोलीस उपायुक्त (विशेष सेल) पी. एस. कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद मुस्तकीम खान उर्फ अबू यूसुफ हा उत्तर प्रदेशाच्या बलरामपूर जिल्ह्यातील बधिया भैसाही गावाचा रहिवासी आहे आणि त्याच्याकडे दोन प्रेशर कुकर आयईडी मिळाले आहेत. त्यांनी सांगितले की खान याचा राष्ट्रीय राजधानीच्या गर्दीच्या ठिकाणी ‘लोन वुल्फ’ हल्ला करण्याची त्याची योजना होती. ‘लोन वुल्फ’ हल्ला हा दहशतवादी हल्ल्याचा नवा प्रकार आहे. यात दहशतवादी रोजच्या वापरातल्या सामान्य गोष्टींचा वापर करतात. यात एकच व्यक्ती हल्ला करू शकते. युसूफकडे मिळालेल्या आयईडीमध्ये त्याला केवळ टायमर लावायचे होते.

 ‘आयईडी लावल्यास तो इशाऱ्याची वाट पाहात होता

दिल्लीच्या एका न्यायालयाने आयएसआयएसच्या अबू यूसुफ नावाच्या दहशतवाद्याला आठ दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे. डीसीपी कुशवाहा यांनी सांगितले की अबू यूसुफने १५ ऑगस्टच्या आधी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता, पण कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे त्याला तसे करता आले नाही. त्यांनी सांगितले, ‘आयईडी लावल्यास तो इशाऱ्याची वाट पाहात होता आणि तो मिळताच फिदायीन हल्ला करणार होता. पण हल्ला कधी आणि कुठे करायचा हे त्याला सांगण्यात आले नाही. यामुळे एक दहशतवादी हल्ला टळला.’

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या